निरोप घेतला तू
न पुन्हा येण्यासाठी
उंब-यावरी मृत्यु
कासावीस नेण्यासाठी …

कळे न माझे मला
प्रीत खरी कुणाची..
चिते वरी सरणाशी
सलगी जडे मनाची
का श्वास घ्यावे सांग\ शेवटी विझण्यासाठी…

पुसे मलाच मृत्यु
ही कैशी बेईमानी?
मैफिलीत कुबेरांच्या
रुजते अशी विराणी?
चेहरा ईथे लपवितो
मी दोष घेण्यासाठी..


कवी - निशांत तेंडोलकर