तू सांगतेस आता की, मी माझी न राहिली
अशी रात्र एक मी, तुझ्या पायी वाहीली

मोह होता व्हावे कधी, एकदा तरी तुझी कविता
अर्थ द्यावे मी ही कधी, तू शब्द होता वाहता

कवितेच्या मोहात अजूनी, कविता ही मोहात माझ्या
का अजूनी देहात चाले, रोज शब्दांचा गाजावाजा?

घेतले जे आशय समजून , ते अर्थ होऊन उतरावे
ओळी शेवटच्या वाचताना, ते डोळ्यातूनी वाहावे

त्या क्षणी असा सुटावा, हा प्राण सोडूनी दिठी
अशी खोल रुतावी कविता, जशी ही शेवटची मिठी


कवी - निशांत तेंडोलकर