एक काहूर उठते
दिसतो खोल तळ
माझ्याच मनाला लागते
माझ्याच मनाची झळ..
अगतिक वेळ धावते
होतो भावनांचा आधार
रीतसर भाव लागतो
कल्पनांचा बाजार
तेव्हा मोल करत नाही
सरळ कविता विकून टाकतो
मला सांगा रसिक सुद्धा
कधी मनापासून काही मागतो?
द्यावे कधी कोणालाही
निशुल्क अमूल्य असे काही
कर्ण ही व्हावे कधी आपण
नेहमी कृष्ण होणे चांगले नाही..
कवी - निशांत तेंडोलकर