कधी वाटते, पुन्हा एकदा
पाऊस यावा, रितेपणाचा
वाहून जावे, सारे काही
स्वच्छ व्हावा, तळ मनाचा
भिजूनी जावे, आपण दोघे
पावसाच्या, मोजीत रेघा
मुरावा पाऊस, खोल इतका
पुसुनी टाकुन, साऱ्या भेगा\
चिंब चिंब मग, सारे काही
तोल सुटावा, मग कोणाचा..
किती खोलवर, उमटत जाते
तव पावलांची, नाजूक नक्षी
कस्तुरीच्या सुगंधाचा
वारा होतो, अबोल साक्षी\
लिहीत जातो मी ही मोकळे
ओळी सुचती या गाण्याच्या…
कवी - निशांत तेंडोलकर