अंधाराचा एक पाऊस
लख्ख असा एक प्रकाश
सोडलेला एक हात अन\
तुटलेला तो एक श्वास
आता मागे काही खुणा
‘तुझ्या’ ‘माझ्या’, ‘आपल्या’
एक निश्चल देह तिथे
अन थकलेल्या सावल्या
जपून ठेव तू तुझे
‘मी’ पणाचे सारे दिवे..
सरणावरी घेऊन जाईन
मी जपून ते माझ्यासवे..
काळ गेला वेळ गेली
मागे राहिले केवळ श्यून्य
तुझे हिशेब तुझ्याच पुरते
गणले गेले सारे पुण्य
बोलू कशाला मी सुद्धा
नुकताच झालो मोकळा
जन्म नको पुन्हा इथला
देह जळो सगळा सगळा..
मी गेलो तरी डोळ्यांमध्ये
आणू नकोस आसवे..
स्वार्थी हेतू माझे म्हनूनी
तू दुर्लक्ष कर भास हे..
मी होतो, आता नाही
फरक कधी पडलाच नाही
अस्तास गेला देह परी
तू नाते कधी जगलाच नाही.
कवी - निशांत तेंडोलकर