आवाज शांततेचा
सुखावेल ऐकुनी
त्या पल्याड वेदनेच्या
जाऊ नये कोणी

जिथे मागणे ही
आता भीक वाटे
अशी नाती सारी
टिकवू नये कोणी\

अपराधी वाटे
नजरेत स्वतःच्या
तेव्हा श्वास सुध्दा
घेऊ नये कोणी

सोडून द्यावे सारे
सुखाच्या क्षणाला
इथे कथा आपली
लांबवू नये कोणी.


कवी - निशांत तेंडोलकर